अकलूज: माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर, शिवपुरी मळा, श्रीपुर, आदी भागातील शेतकऱ्यांच्या शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी करत खंडकरी शेतकऱ्यांचे नेते अँड सोमनाथ (आण्णा) वाघमोडे व भानुदास (आप्पा) सालगुडे-पाटील यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी अकलूज येथील प्रांतकार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित (भैय्या) बोरकर यांनी भेट देत संघटनेच्या वतिने जाहीर पाठिंबा दिला आहे. उपोषणकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असुन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शासनाने उपोषणाची दखल न घेतल्यास लवकरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा भडका उडेल याचे परीणाम सरकारला भोगावे लागतील असा ईशारा अजित (भैय्या) बोरकर यांनी बोलतांना दिला आहे. यावेळी स्वाभिमानीचे साहील आतार, समाधान काळे, तेजस भाकरे,अहिल पठाण,साधू राऊत, सोमनाथ बागव अभिजित गवळी यांच्या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या