भाजपमधील मोहिते पाटलांनी महार,मातंग,होलार समाजाला उमेदवारी घोषित केल्यास मोर्चाला अर्थ

भाजपमधील मोहिते पाटलांनी महार,मातंग,होलार समाजाला उमेदवारी घोषित केल्यास मोर्चाला अर्थ


नाही तर काहीही योगदान नसताना चर्मकार समाजाचा उमेदवार पुन्हा पडणार पदरात

त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील मातंग,महार,होलार समाजाने वेळीच सावध होणे गरजेचे 

तीन समाजाचा वापर कोण करतंय याचा विचार करून मोर्चात सामील व्हावे..


प्रतिनिधी : माळशिरस : चर्मकार समाजाला भाजपमधील मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्याचे नेतृत्व करण्याची तीन वेळा संधी दिली ? चर्मकार समाज हा उत्तमराव जानकर यांच्या बनावट दाखला प्रकरणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी आणि सक्रिय असल्याचे दिसून येत नाही.चर्मकार समाजाला मोहिते पाटील यांनी तीन वेळा संधी दिली.माळशिरस तालुक्याचे आमदार होण्याचे संधी ज्या समाजाला देण्यात आली तो समाज या प्रक्रियेमध्ये कोसो धूर असलेचे दिसून येत आहे.या समाजाला उमेदवारी देत असताना ५९ जाती पैकी इतर जाती मोहिते पाटील यांना आठवल्या नाहीत का? फक्त चर्मकार समाजच उमेदवारीसाठी का दिसला ? आणि त्या चर्मकार समाजाचा उमेदवार मुंबईवरून आणि नगर वरून आयात का करावा लागला ? याचे आत्मपरीक्षण मोर्चामध्ये सामील होणाऱ्या आंबेडकरी जनतेने केलं पाहिजे आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी केलं पाहिजे. भाजपमधील मोहिते पाटलांच एक धोरण आहे मांग,महार, होलार आणि इतर अनुसूचित जाती जमाती मधील जातीच्या लोकसंख्या जास्त प्रमाणात असल्याकारणाने या जातींना विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवलं आणि ज्यांची लोकसंख्या बोटावरती मोजणी इतकी आहे अशा चर्मकार समाजाला या माळशिरस तालुक्यातील जनतेचे नेतृत्व करण्याची तीन वेळा संधी देण्याचे पाप भाजपमधील मोहिते पाटील यांनी केले आहे. त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या दाखल्याच्या विरोधामध्ये मोर्चा आयोजित केलेला असताना खरंतर त्याचे नेतृत्व हे चर्मकार समाजाने करण अपेक्षित होतं मात्र नेहमीप्रमाणे मांग,महार, होलार या तिन्ही समाजाच्या लोकांचा ढाली सारखा वापर करून त्यांना सर्व प्रक्रियेमध्ये पुढे करून उत्तमराव जानकर यांच्या विरोधामध्ये उभे करण्यासाठी भाजप मधील मोहिते पाटीलांनी डाव आखला आहे.उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखला प्रकरणामुळे ज्या लोकांना वाटतय की आपल्या समाजावर ती अन्याय झालाय आपल्या समाजावर अन्याय होतोय त्या लोकांनी भाजपमधील मोहिते पाटील यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे की,मातंग,महार,होलार समाज यापैकी तुम्ही गेली तीन टर्म कोणालाही उमेदवारी का दिली नाही ? चर्मकार समाजालाच उमेदवारी का दिली ? असा जाब विचारण्याची ताकद मोर्चाच्या अयोजकामध्ये आहे का ? उत्तमराव जानकर यांनी खरोखरच ५९ जातीमध्ये घुसकोरी केली असेल,त्याबद्दल कोणालाही कसलीही तक्रार नाही.मात्र काही अनुसूचित जाती जमातीतील जाणकार लोकांचं मत आहे की, हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जर उत्तमराव जानकर यांचा दाखला रद्द झाला तर त्यांना जाब विचारला जाईल.तसाच जाब महार,मांतंग, होलार या जातीला उमेदवारी का दिली नाही ? म्हणून मोहिते पाटील यांना हे विचारने सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.महार,मातंग,होलार समाजाला विधानसभेच्या उमेदवारीच्या प्रक्रियेमध्ये कुठे घेतलं नाही म्हणून हे दुर्दैव ज्यांनी नशिबी आणलं त्या भाजपमधील मोहिते पाटलांना जाब विचारण्याची वेळ सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून आता मिळालेली आहे.उत्तमराव जानकर यांचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण जोपर्यंत पूर्ण होत नाही.त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याच्यावरती मोर्चा काढणं आंदोलन करणे हे बालिशपणाचे लक्षण असल्याची सांगितले. तशी चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यामधील जनतेमध्ये चालू आहे.चर्मकार समाज हा मोर्चामध्ये सामील का झाला नाही आहे ? हा संशोधनाचा विषय झालेला दिसून येत आहे.

माळशिरस तालुक्यात भाजपमधील मोहिते पाटलांनी दिलेला उमेदवार फिक्स आमदार होणार हे माहिती असताना महार,मातंग,होलार व इतर जातीतील उमेदवार मोहिते पाटलांनी का दिला नाही ? याचे आत्मपरीक्षण समाज करणार आहे का नाही ? 

महार,मातंग,होलार व इतर जातीतील लोकांना उमेदवारी देण्यास मोहिते पाटील यांचा विरोध आहे,हे गेली तीन टर्म आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे,त्यामुळे समाजाने आता उघडे डोळे ठेवून वागायला चालू केले पाहिजे.आताची लढाई महार ,मातंग,होलार या समाजाच्या जीवावर लढली जाणार आहे,मात्र त्यांना माळशिरस तालुक्याचे आमदार होण्याची संधी मोहिते पाटील देतील का ? हा संशोधनाचा विषय आहे.हा काढण्यात येणारा मोर्चा महार,मातंग,होलार,या समाजाला उमेदवारी मिळावी म्हणून की,पुन्हा चर्मकार उमेदवार बोकांडी घेण्यासाठी ? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महार,मातंग,होलार समाजाला उमेदवारी देणार असे मोहिते पाटील यांनी अगोदर जाहीर करावे किंवा मोहिते पाटील यांनी तीन जातींना उमेदवारी न दिल्यास मोहिते पाटील यांच्या विरोधात काम करू असे मोर्चाचा आयोजकांनी जाहीर केल्यास या मोर्चाला अर्थ आहे नाहीतर लढाई लढायला तीन समाज आणि मलिदा खायला चर्मकार समाज. ये रे माझ्या मागल्या सारखी अवस्था.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या