मोर्चासाठी सत्ताधारी आणि माजी आमदार पुत्र यांच्याकडून ११ लाख रुपये आयोजकांना सुपूर्द...
प्रतिनिधी : माळशिरस : आक्रोश मोर्च्याच्या नावाखाली आयोजकांमधील एक ते दोन लोकांनी इतरांना अंधारामध्ये ठेवून अकलूज गावच्या आसपास आणि परिसरामध्ये असलेल्या खडी क्रेशर तसेच अकलूज मधील डॉक्टर आणि माळशिरस तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी यांच्याकडून आर्थिक स्वरूपात मदत घेतली असल्याची माहिती संबंधितांच्या सूत्राकडून मिळाली आहे.हा निघणारा मोर्चा सत्ताधारी लोकांच्या बगलबच्चनी आयोजित केलेला आहे. अयोजकांपैकी कोणी पैसे गोळा केले असतील हे आयोजकांमध्ये असलेल्या सर्व लोकांना माहिती आहे. मोर्चाला सत्ताधारी आणि माजी आमदार पुत्र यांनी आर्थिक मदत केलेली असताना माळशिरस तालुक्यातील खडी क्रशरचे मालक,डॉक्टर,अधिकारी यांना ब्लॅकमेल करून जोड गोळीने पैसे गोळा केले असल्याची माहिती सार्वजनिक झाली आहे. निघणारा मोर्चा हा ठरवुन काढला जाणार असल्याचे सिद्ध होत आहे.मोर्चाच्या आयोजकांना सत्ताधारी पार्टी कडून आणि माजी आमदार पुत्र यांच्याकडून जवळजवळ अकरा लाख रुपये प्राप्त झाले असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यामधील जनतेत चालू आहे.मोर्चा पैशासाठी काढलेला आहे का ? अशीही चर्चा संपूर्ण अकलूज परिसरामध्ये चालू आहे.या मोर्चाचे कर्ता-करविता तालुक्यातील सत्ताधारी पार्टीची लोक असल्याचे आता झाकून राहिले नाही.मोर्चाला राजकीय रंग देण्याचे काम सत्ताधारी पार्टीने केले आहे.मोर्चाच्या आयोजकांना अकरा लाख रुपये दिले असताना आकारा लाख रुपये मधून मोर्चामध्ये येणाऱ्या मोर्चेकरांना किती पैसे मिळणार आहेत ? त्यांना किती पैसे दिले जाणार आहेत ? याचा खुलासा आयोजकांनी करणे फार गरजेचे आहे.
0 टिप्पण्या