आयोजकांपैकी एक दोन जणांनी इतरांना अंधारात ठेवून आमदार पुत्राला केली पैश्याची मागणी...
प्रतिनिधी : माळशिरस : उत्तमराव जानकर यांच्या दाखल्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला एका दिवंगत आमदार यांचे सुपुत्र आणि भाजपमधील नेत्यांकडून आर्थिक रसद पुरवल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे.एका माजी आमदाराने त्यांची राजकीय कारकीर्द उत्तमराव जानकर यांचा दाखला रद्द करण्यासाठी वाया घालवली.
त्याच्यानंतर त्यांचे पुत्र यांनी ती परंपरा कायम ठेवत भाजपमधील नेत्यांच्या अंतर्गत सहकार्याने चालू ठेवली असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.उत्तमराव जानकर यांच्या दाखल्याच्या चौकशी संदर्भात प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाचे आयोजक भाजपमधील नेत्यांचे कट्टर समर्थक आहेत.मोर्चाच्या आयोजकांनी माजी आमदार पुत्र यांची भेट घेतली असल्याची चर्चा चालू आहे.मोर्चाच्या अनुषंगाने लोकांना येण्यासाठी मोठा खर्च होणार आहे.तरी आपणही मदत करावी अशी बैठकीत झाली चर्चा झाली असल्याचे सर्वसामान्य जाणतेमधून बोलले जात आहे. आयोजक आमदार पुत्र यांना भेटल्यानंतर काही एक दोन लोकांनी आयोजकांच्या परस्पर त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अयोजकांपैकी एक दोन लोकांनी माजी आमदार पुत्र यांना निरोप पाठवुन व संपर्क करून लोकांना मोर्चा आणण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.तरी आपण आर्थिक मदत करावी अशी इतरांकडून मागणी केली असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चाला भाजपमधील नेत्यांनी आणि माजी आमदार पुत्र यांनी आर्थिक रसद पुरवल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे.
0 टिप्पण्या