निमित्त मोर्च्याचे अपेक्षा नगरपरिषदेच्या उमेदवारीची ! वापर सर्व आंबेडकरी जनतेचा उद्देश स्वतःच्या मालकाला खुश करण्याचा....

निमित्त मोर्च्याचे अपेक्षा नगरपरिषदेच्या उमेदवारीची ! 
वापर सर्व आंबेडकरी जनतेचा 
उद्देश स्वतःच्या मालकाला खुश करण्याचा....

आंबेडकरी जनतेने यांचा उद्देश साध्य करण्यासाठी मोर्चात सामील व्हायचं का ?आणि त्यांच्या मालकाला खुश करण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवायचा का ? 

न्याय प्रविष्ट प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेला निर्णय घेण्याचा अधिकार नसताना मोर्चाचा अट्टाहास राजकीय हेतूसाठीच ! 


प्रतिनिधी : प्रतिनिधी : हिंदू खाटीक जातीचे खोटे प्रमाणपत्र काढल्याच्या प्रकरणावरून उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी.या मागणीसाठी अकलूज मध्ये 16 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चाचे आयोजन भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते यांनी केले असून उत्तमराव जानकर यांच्या दाखल्याचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी,स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी,स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी,स्वतःच्या भाऊबंदकीला जपण्यासाठी आणि भाजपमधील मोहिते पाटील यांना खुश करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याची चर्चा संपूर्ण अकलूज परिसरामध्ये चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.या मोर्चाचा उद्देश राजकीय स्वरूपाचा असून न्यायप्रविष्ठ प्रकरणावरती जात पडताळणी समिती,जिल्हाधिकारी,
प्रांताधिकारी,तहसीलदार यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याला या जातीच्या प्रमाणपत्रावरती कार्यवाही करण्याचा अधिकार नसताना त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढणे हे दिवाळखोरीचे आणि अज्ञान पणाचे लक्षण असल्याची चर्चा सुरु आहे. हा विषय पूर्णपणे राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजप मधील मोहिते पाटील यांनी स्वतःचे कट्टर कार्यकर्ते असणाऱ्या सात ते आठ कार्यकर्त्यांवरती जबाबदारी टाकून त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून उत्तमराव जानकर यांच्या विरोधामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले आहे.या मोर्चाच्या अनुषंगाने हे स्पष्ट होत आहे.या मोर्चाच्या नियोजनामध्ये असलेले बरेच कार्यकर्ते हे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने आणि हाच उद्देश मनामध्ये ठेवून या मोर्चाच्या नियोजनामध्ये धावपळ करताना दिसत आहे.मात्र या सर्व मोर्चाच्या नियोजनामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही नेत्याला सहभागी करून घेतलं नाही.हाही अभ्यास करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे या लोकानी आयोजित केलेला मोर्चा हा राजकीय उद्देश घेऊनच आयोजित केला असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये चालू आहे.त्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरणावरती कोणताही प्रशासकीय कार्यालय काहीही कार्यवाही करू शकत नाही. हे माहीत असताना सुद्धा भाजपमधील मोहिते पाटलांनी स्वतः च्या कट्टर कार्यकर्त्यांना सोडून त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून उत्तमराव जानकर यांना कोंडीत पकडण्याचा डाव आखला असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यामधील जनतेमध्ये चालू आहे.ज्यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे,त्यापैकी अनेकजण उमेदवारी मिळेल या आशेने पळताना दिसत आहेत.जे पळतायत ते फक्त एकाच जातीचे आहेत, मोर्चा काढल्यानंतर उमेदवारी त्यांनाच मिळणार आहे, मग त्याच्या मोर्चात आंबेडकरी जनता सामील झाल्यास आंबेडकरी जनताच उमेदवारी पासून दूर जाईल यात तीळ मात्र शंका नाही.म्हणून मोर्चा आयोजित करणाऱ्यामध्ये असलेल्या अकलूजमधील चार ते पाच लोकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवली असल्याची चर्चा अकलूजमधील जनतेमधून चालू आहे.मोर्चा बद्दल अकलूज मधील जनतेमध्ये असलेली प्रतिमा,,, ' निमित्त मोर्च्याचे अपेक्षा नगर परिषदेच्या उमेदवारीची ' वापर सर्व अनुसूचित जाती जमाती बरोबर आंबेडकरी जनतेचा ' उद्देश स्वतःच्या भाजमधील मधील मोहिते पाटलांना खुश करण्याचा ' म्हणून आंबेडकरी जनतेने यांचा उद्देश साध्य करण्यासाठी मोर्चात सामील व्हायचं का ' ? आणि त्यांच्या मालकाला खुश करण्यासाठी सामील व्हायचं का ? ज्यांनी मोर्चाच्या नियोजनामध्ये आंबेडकरी नेत्यांना सामावून घेतलं नाही त्यांच्या अकलूज नगरपरिषदेच्या उमेदवारी साठी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवायचा का ? अशीच आहे.म्हणून हा मोर्चाचा विषय चर्चेचा बनला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या