प्रतिनिधी : सुमित्रा नगर यशवंत नगर तालुका माळशिरस येथे भाड्याने राहत असलेल्या महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ओरसे यांच्यासह चौघांवर भांदवि 323,354,452,504,506,43 प्रमाणे अकलूज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एक 35 वर्षीय तरुणी सुमित्रा नगर येथे तिच्या कुटुंबासह भाड्याने राहत आहे दिनांक 24 मार्च 2023 रोजी सायंकाळी सात वाजता तिच्या घराजवळ काही व्यक्ती तिच्या घरमालकाला मारहाण व शिवीगाळ करत असताना तिला दिसले तिने खाली येऊन का मारता त्याची काय चूक आहे असे विचारले असता अंबादास ओरसे व त्यांच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की शिवीगाळ केली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत तु आमच्या नादाला लागू नको असे म्हणत तिला लाथा बुक्यांनी मारहाणही केली,महिला जास्त आरडाओरडा करू लागताच अंबादास ओरसे त्याचा मुलगा व अन्य दोघे चार चाकी गाडीतून पळून गेले.याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही,त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाला कलंक लागल्याची चर्चा संपूर्ण अकलूज परिसरामध्ये चालू झाली असून गुजरात मधील व्यापाऱ्याला फसवल्याप्रकरणी 420 चा गुन्हा दाखल असलेल्या अंबादास ओरसे यांनी महिलेचा विनयभंग केल्याने आणि त्यांच्या पक्षातील काही साथीदारनी त्यांना प्रोत्साहन दिल्याने पक्षाच्या नावाची बदनामी होत असल्याची चर्चा अकलूज शहरांमध्ये चालू आहे,महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यासाठी सिंहाचा वाटा असलेल्या शरद पवार यांच्या पक्षामध्ये काम करणारा पदाधिकारी महिलांचा सन्मान करू शकत नाही अशी भावना संपूर्ण अकलूज शहरातील आणि परिसरातील जनतेमध्ये चालू झाली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि शरद पवारांच्या नावाला अकलूज मध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये चर्चिले जात आहे.भाजपमधील मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये भिनसले असल्यानेच त्यांनी पक्ष सोडला होता,भाजपमधील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.फसवनूक प्रकरणातील अंबादास ओरसे यांना पक्षाचे पद दिल्यानंतर ही पक्षाची बदनामी झाली होती आणि त्याच ओरसे यांनी महिलेचा विनयभंग करून पक्षाच्या नावाची बदनामी करण्यासाठी खतपाणी दिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यामधून बोलले जात आहे.गुजरात मधील व्यापाऱ्यांना फसवणाऱ्या आणि महिलेचा विनयभंग करणाऱ्या ओरसे यांच्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत असल्याने पक्षाची प्रतिमा जनसामान्यांत खराब होऊ लागल्याने पक्ष ओरसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का ? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
सुमित्रा नगर यशवंतनगर येथील महिलेचा विनयभंग आणि मारहाण करण्यासाठी गेलेल्या अंबादास ओरसे आणि त्यांच्या मुलांसोबत इतर दोन पक्षातील कोण लोकं होती याचा शोध पोलीस घेणार आहेत,त्यामुळे ओरसे यांच्याबरोबर सावली सारखी असलेल्या त्या दोन व्यक्ती कोण अशीच चर्चा अकलूजमधील जनतेमध्ये चालू आहे.
0 टिप्पण्या