डॉ.धवलसिंह,उत्तमराव जानकर,फत्तेसिंह माने पाटील,के.के.पाटील यांची विरोधी आघाडी झाल्याने सत्ताधारी यांची झोप उडाल्याची चर्चा
प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी तसेच जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य के के पाटील हे माळशिरस तालुक्यातील विरोध गटांमध्ये सामील झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटलांनी के के पाटील यांची धास्ती घेतली असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये चालू आहे. नुकत्याच होऊ घातलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, फत्तेसिंह माने पाटील,उत्तमराव जानकर,के के पाटील आणि इतर विरोधी पक्षातील मान्यवर यांनी आघाडी करून सत्ताधारी मोहिते पाटील गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान उभे राहत असताना ज्या पक्षांमध्ये सत्ताधारी मोहिते पाटील आहेत त्याच भाजप पक्षाचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी विद्यमान जिल्हा नियोजन समितीचे सदस्य केके पाटील यांनी विरोधी गटात सामील होऊन ही निवडणूक चुरशीची बनवली आहे.भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या के.के पाटील यांचा धसका सत्ताधारी मोहिते पाटील गटांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील विरोधी गटांमध्ये के.के पाटलांनी जाणे हे सत्ताधारी मोहिते पाटील यांना धक्का मानला जात आहे.तालुक्यातील विरोधी गटात डॉ धवलसिंह,उत्तमराव जानकर,के.के.पाटील,फत्तेसिंह माने पाटील आणि सत्ताधारी मोहिते पाटील यांच्या विरोधात काम करणारे सर्व पक्ष सामील झाल्याने निवडणुकीमध्ये विरोधी गट बाजी मारेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले के के पाटील यांनी विरोधी गटात उडी मारल्याने आणि विरोधी गटाला पाठिंबा दिल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या सत्ताधारी मोहिते पाटलांनी के.के पाटलांच्या भूमिकेची आणि डॉधवलसिंह मोहिते पाटील,उत्तमराव जानकर यांनी केलेल्या विरोधी आघाडीची धास्ती घेतल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झालेले आहे.सत्ताधारी मोहिते पाटील यांच्या गटामध्ये असलेल्या कार्यकर्त्यामधून के.के.पाटील यांची तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे करण्याची मागणी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे,मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत त्यामुळे भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी के.के.पाटील यांची तक्रार सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे करणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ? वरिष्ठ पदाधिकारी के.के.पाटील यांना काय आदेश देणार ? आणि जर आदेश दिला तर के.के.पाटील पाळणार का ? हा येणारा काळच ठरवेल.
0 टिप्पण्या