गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.

गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.

टेंभुर्णी : मौजे अकोले (खु) येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील बी. फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विद्यार्थ्यांची कुपवाड एमायडीसी मधील सिम्बायोसिस औषधनिर्माण कंपनीला भेट दिली अशी माहिती प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कंपनीतील विविध विभागाची माहिती घेतली. कंपनीचे संचालक व कर्मचारी यांनी कंपनीतील सर्व उत्पादनांची तसेच सर्व विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कंपनीची एकूण २७० उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
यामध्ये प्रोडक्शन, क्वालिटी, पॅकिंग, लेबलिंग, इन्स्पेक्शन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा विविध डिपार्टमेंटची माहिती दिली. तसेच कंपनीतील एंट्री आणि एक्झिट प्रोसिजर, गाउनिंग प्रोसिजर , सॅनिटेशन व हेल्थ हायजिन, प्रायमरी पॅकिंग, सेकंडरी पॅकिंग,रॉ मटेरियल स्टोरेज व प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर योग्य उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. या कंपनीच्या उत्पादनांना भारतातूनच नव्हे तर संपुर्ण जगभरातून मागणी आहे. या कंपनीला भेट दिल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडली.
 प्रा. सुकुमार लांडे व प्रा.महादेवी भोसले यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. 
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. रेणुका शिंदे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या