अजित पवारांच्या नावाने चुना लावून बोंबलणारी माणसं त्यांच्याच भेटीला गेली - किरण साठे
माझ ठरलेलं आहे,लवकरच माझी भूमिका जाहीर करणार आहे - किरण साठे
प्रतिनिधी : सचिन रणदिवे
मो नं 9730093611
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमच्यावर अन्याय झाला म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेली काही मंडळी त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार यांना तातडीने भेटण्यासाठी गेले आहेत अशी टिका किरण साठे यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव न घेता केली आहे.
अजित पवार यांना अर्थ खात दिलं गेल्यास आपल्याला निधी उपलब्ध होणार नाही,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा राग अजित पवार यांच्या मनामध्ये असेल याची भीती बहुतेक भाजपवाशी झालेल्या मंडळीना पडलेली दिसत होती,त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या आहेत असा टोमणा किरण साठेंनी मारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना अजित पवारांच्या नावाने चुना लावून बोंबलणारी माणसं त्यांच्याच भेटीला गेली असल्याने आणि सोलापूर जिल्ह्यातील काही घडामोडी घडणे बाकी आहेत,त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणावर लवकरच माझी भूमिका जाहीर करणार असून माझं ठरलेलं आहे अशी माहिती किरण साठे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
0 टिप्पण्या