मारकडवाडी येथील गायरान जमीन गट नंबर 233 मधील अतिक्रमण धारकावर लवकरच हातोडा..

मारकडवाडी येथील गायरान जमीन गट नंबर 233 मधील अतिक्रमण धारकावर लवकरच हातोडा..

वश्या मारुती मंदिर परिसरातील गायरान जमिनी वरील अतिक्रमानाचा मुद्दा पेटला..
प्रतिनिधी सचिन रणदिवे 

मौजे मारकडवाडी येथील गायरान जमीन गट नंबर 233 क्षेत्रामध्ये लगतचे शेतकरी यांनी अतिक्रमण केले आहे हे सरकारी मोजण्या अंती सिद्ध झाले असून सदर क्षेत्रामध्ये माळशिरस तालुक्यातील प्रसिद्ध असे वश्या मारुती मंदिरा असुन सदर मंदिर तीर्थक्षेत्रामध्ये समावेश असून मंदिर परिसरामध्ये ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध विकासकामे झाले आहेत व सुरूही आहेत तरी सदर गायरान क्षेत्रातील जागाही सार्वजनिक वापराच्या हेतूने शिल्लक ठेवणे आवश्यक आहे तरी सदर क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यासाठी योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांना निवासी नायब तहसीलदार श्री कदम साहेब यांच्यामार्फत मारकडवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ विजया जिजाबा मारकड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मारकडवाडी गावचे माजी सरपंच अमित वाघमोडे-पाटील, सोपान वाघमोडे-पाटील ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रणदिवे, पांडुरंग चोपडे, आप्पासाहेब मारकड,अविनाश कोडलकर,प्रहार संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष नानासाहेब काळे, तालुका उपाध्यक्ष संभाजी गावडे, रामचंद्र माने, शंकर विरकर,पत्रकार सचिन रणदिवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रती मा.जिल्हाधिकारी साहेब सोलापूर,
मा प्रांताधिकारी साहेब माळशिरस विभाग अकलूज यांना देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या