प्रतिनिधी सचिन रणदिवे
माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक युवकांचे आधारवड युवा उद्योजक मा श्री सचिन (आप्पा) शिवाजीराव वावरे यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सचिन (आप्पा) वावरे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले आहे.
माळशिरस शहरात गेले अनेक वर्षापासून त्यांचे वडील कै . शिवाजीराव वावरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य सायकल वाटप तसेच नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला जातो त्याचाच एक भाग म्हणून युवकांचे आधारवड युवा उद्योजक मा श्री सचिन (आप्पा) वावरे यांचा वाढदिवस सोमवारी १० रोजी संपन्न होत आहे.
सचिन वावरे यांचा वाढदिवस दिनांक १० जुलै 2023 रोजी असल्याने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी 21 हजार वह्यांचे वाटप व स्कूल बॅग करण्यात येणार आहे . त्याचबरोबर रक्तदान शिबिर तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे आयोजन केलेले आहे . हा कार्यक्रम सचिन (आप्पा)वावरे यांच्या निवासस्थानी 10 वाजता होणार आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान महेश वावरे यांनी माहिती सेवाभावी टाइम्स यांच्याशी बोलताना केले आहे.
0 टिप्पण्या