प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
माळशिरस तालुक्यातील नवीन 21 स्वस्त धान्य दुकानांचे प्रसिद्धीकरण करण्यात आलेले आहे आपणाकडे प्रत्येक गावांमधून अर्ज आलेले आहेत त्यामध्ये महिला बचत गट व सामाजिक संस्था याचे अर्ज आपल्याकडे दाखल झालेले आहेत त्यामध्ये अनेक सदस्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने आपण स्थानिक पोलीस स्टेशनला कळवून त्याची माहिती घ्यावी व त्या महिला बचत गट व सामाजिक संस्था यांच्या ज्या सदस्यावर गुन्हा दाखल आहे त्यांचा अर्ज आपण नामंजूर करावा ही विनंती व त्या व्यक्तीवर शासकीय नियमानुसार गुन्हा दाखल करावा ही विनंती अशा आशायाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग सोलापूर जिल्हा सरचिटणीस मा.साजिदभाई सय्यद यांनी तहसीलदार माळशिरस यांना दिले आहे सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्य, उपायुक्त पुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाताई लांडगे मॅडम यांना दिल्या आहेत.
0 टिप्पण्या