अकलूजमध्ये डॉ.आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न !

अकलूजमध्ये डॉ.आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न ! 

२०३ रुग्णांची तपासणी आणि उपचार  

किरण साठे यांचा स्तुत्य उपक्रम


प्रतिनिधी : : साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूजमधील डॉ.आण्णाभाऊ साठे नगर तथा महर्षी कॉलनी येथे आरोग्य शिबिर आयोजित केले होते.सर्वप्रथम साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी किरण साठे, लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,गणेश साठे,बाबाजी खंडागळे, सोमनाथ लोखंडे,आनंद मिसाळ,वैभव लोखंडे, रफिक मुलाणी,आदित्य काकडे,साहिल अडगळे,विशाल गवळी,आकाश अडसूळ,अविनाश लोखंडे,इरफान बागवान,दीपक खंडागळे, पारितोष खंडागळे,इत्यादी उपस्थित होते.

शिबिरामध्ये ब्लड प्रेशर,कम्प्लेट हिमोग्राम,ब्लड ग्रुप,सिरम क्रियाटिन,एच,बी,ए 1 सी,ताप, डोळे या तपासण्या करण्यात आल्या.एकूण २०३ रुग्णाची तपासणी करून उपचार करण्यात आले.माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका शिंदे,डॉ.गौरव जाधव,डॉ आडके मॅडम,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सुनील वाघमारे श्रीमती बाबर,गावडे,सिस्टर व आशा वर्कर आणि सुंदर गायकवाड यांच्या सहकार्याने शिबीर संपन्न झाले.त्यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.किरण साठे यांचा जयंतीनिमित्त आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या