प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सातारा-सोलापूर यांसह काही अपवाद वगळता इतर बस थांंबत नसल्याने भाळवणी,पंढरपूरल येथे जाणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आसलेल्याबाबतचे महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सुजित दिगंबर सातपुते यांनी यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांना पत्रकार दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील,प्रमोद भैस,शाहरुख मुलाणी,गणेश देशमुख आदि पत्रकारांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन दिले होते.याच निवेदनाची व पत्रकारांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार राम सातपुते यांनी निवेदन दिलेल्या दिवशीच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे सोलापूर जिल्हा आगार प्रमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून पिलीवमध्ये अधिकृत थांबा आहे तिथेच सर्व बस थांबल्या पाहीजेत,तुमच्या बस चालक व वाहक यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मतदार संघातील विद्यार्थ्यांची व प्रवाशांची हेळसांड होत आहे.अशी तंबी दिली.यावर लागलीच आगार प्रमुखांनी उद्यापासून पिलीव बसस्थानकावरच सर्व बस थांबतील असा आ.सातपुते यांना शब्द दिला व पिलीव बसस्थानकावर आता दररोज आपपल्या वेळेत चालक व वाहक बस थांबवत असल्याचे पहावयास मिळत आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची होणारी हेळसांड थांबली असून एक कॉल प्रॉब्लेम सॉल म्हणजेच आमदार राम सातपुते हे समीकरण बनले आहे.सदर प्रश्न मार्गी लावल्याने विद्यार्थी व प्रवाशी यांच्याकडून आमदार राम सातपुते यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या