मौजे उघडेवाडी येथील गौण खनिज उत्खननाची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत माहिती सेवाभावी संस्थेचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन

मौजे उघडेवाडी येथील गौण खनिज उत्खननाची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत माहिती सेवाभावी संस्थेचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन
दखल न घेतल्यास दिनांक २-११-२०२३ रोजी तहसील कार्यालय समोर माहिती सेवाभावी संस्थेच्या होणार थाळी नाद आंदोलन

प्रतिनिधी -माळशिरस 


मौजे उघडेवाडी या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी यांची गौण खनिज उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना या गटामधून दंडलशाहीच्या जोरावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केले जात आहे. या गटांचा पंचनामा करून आपण संबंधीत गौण खनिज उत्खननाची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे यांच्या वतीने तहसीलदार माळशिरस यांना देण्यात आले आहे सदर निवेदनाच्या अनुषंगाने त्वरित दखल न घेतल्यास माहिती सेवाभावी संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दि. ०२/११/२०२३ रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर निवेदनाची माहितीसाठी प्रत
मा. जिल्हाधिकारी सो, सोलापूर.
मा. जिल्हा खनिकर्म अधिकारी सो, सोलापूर.
मा. पोलीस अधीक्षक सो, सोलापूर ग्रामीण,
मा.उपविभागीय अधिकारी साो, माळशिरस विभाग अकलूज.
मा.माळशिरस पोलीस स्टेशन माळशिरस 
मा. वेळापूर पोलीस स्टेशन, वेळापूर
यांना दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या