अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३०/०९/२०२३ रोजी झालेली आहे, त्या संदर्भात मला अकलूज मार्केट कमिटीचे उत्पादन वाढविण्यासाठी काही विषय मांडायचे होते. त्याचा फायदा माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना व मार्केट कमिटीला झाला असता, पण सर्वसाधारण सभा दहा मिनिटातच उरकून सभापती व संचालक मंडळ उठून पळून गेले.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चे अकलूज व नातेपुते येथे १०८ प्लॉटधारक आहेत, तसेच ४३० व्यापारी गाळे आहेत. या संदर्भात मागील २ वर्षा पासून लेखापरीक्षक श्री. पवार साहेब व श्री. डोके साहेब यांनी वार्षिक लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद केलेले आहे. व्यापारी गाळ्यांचे भाडे व डिपॉझिट कमी व नगण्य आहे, तसेच प्लॉटचे व व्यापारी गाळ्यांचे करार संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळे २८० ते ३०० व्यापारी गाळ्यांचे व प्लॉट धारकांचे फेरलिलाव करावे लागणार आहेत, त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे कमीत कमी ५ कोटीचे डिपॉझिट वाढेल व भाडे ही पाचपट वाढेल. या संदर्भात आम्ही मार्केट कमिटीचे सभापती व सचिव यांच्याकडे मीटिंगमध्ये विषय मांडले पण त्यांनी त्याच्यावर काहीही कारवाई बदल करण्यासाठी पावलं उचलली नाहीत. त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे पुढील कारवाईसाठी तुम्ही संबंधितांना याचा खुलासा करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव शिवदास जानकर यांनी दिले आहे सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रती
0 टिप्पण्या