पक्षप्रमुख किरण साठे यांनी मेळाव्यात केलेल्या कृतीची महाराष्ट्रात चर्चा !

पक्षप्रमुख किरण साठे यांनी मेळाव्यात केलेल्या कृतीची महाराष्ट्रात चर्चा ! 

प्रतिनिधी : सोलापूर : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा लक्ष प्रमुख किरण साठे यांनी अकलूज येथे पक्ष स्थापनेच्या एक महिना च्या आत मध्ये राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले होते त्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख असलेले किरण साठे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये बसून कार्यक्रम केल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वसामान्य जनतेमधून कार्यकर्ते मधून आणि पदाधिकाऱ्यांमधून कौतुक केले जात आहे.पक्षाचा पक्षप्रमुख असलेला व्यक्ती सर्वसामान्य जनतेमध्ये आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बसून कार्यक्रम करीत असेल तर हे महाराष्ट्राला वेगळी दिशा देणार दर्शन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या कृतीतून दिसून आल्याने महाराष्ट्र विकास सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे इतर पक्षाचे पक्ष अध्यक्ष प्रमुख व्यासपीठावर बसूनच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असतात मात्र किरण साठेनी पहिल्याच आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये स्वतः जनतेमध्ये बसून व्यासपीठावर न बसता सर्वसामान्य जनतेमध्ये बसने मान्य केले आणि ही त्यांची कृती अनेकांना भावली आहे.


किरण साठे हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून सर्वसामान्य जनतेच्या व्यथा त्यांना सर्वश्रुत आहेत,कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा मोठेपणा त्यांच्या स्वभावात जाणवून येत नाही,उलट सर्वांना एकत्र करून संघटन करणे त्यांच्या आवडीचे काम आहे,आलेला प्रत्येक माणूस त्यांच्याकडून समाधानी कसा होऊन जाईल याची ते नेहमीच काळजी घेत आहेत.त्यामुळे त्यांची क्रेज सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या प्रकारे आहे.आणि त्यांनी पक्षाच्या आयोजित केलेल्या मेळाव्याच्या कार्यक्रमात स्वतः कार्यकर्ते,पदाधिकारी, आणि जनतेमध्ये बसल्याने त्यांच्या कृतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होताना दिसत आहे.




कार्यकर्ते,पदाधिकारी व जनता महत्वाची आहे
अकलूज मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता,त्यामध्ये व्यासपीठावर न बसता कार्यकर्ते,पदाधिकारी व जनतेमध्ये बसने योग्य वाटले,कारण आपण कार्यकर्ते,पदाधिकारी आणि जनतेच्या जीवावरच नेता होत असतो म्हणून माझ्यासाठी मेळाव्याला आलेले सर्वजण हे पक्षप्रमुखच होते त्यामुळे त्यांना समोर बसवून स्वतः व्यासपीठावर बसने उचित वाटले नाही,ज्यावेळी माझ्या स्वतःच्या गावात कार्यक्रम आयोजित करण्यात येईल त्या सर्व कार्यक्रमांना व्यासपीठावर न बसता कार्यकर्ते,पदाधिकारी आणि जनतेमध्येच बसणार
किरण साठे
पक्षप्रमुख - महाराष्ट्र विकास सेना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या