कोंडबावी या ठिकाणच्या गौणखणीज उत्खननाची चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे बाबत माहिती सेवाभावी संस्थेचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन

कोंडबावी या ठिकाणच्या गौणखणीज उत्खननाची चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे बाबत माहिती सेवाभावी संस्थेचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन 
मौजे कोंडबावी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी नसताना हजारो ब्रास दगड उत्खनन करण्यात आले असून सदर गटाचा पंचनामा करणे व शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबन करण्यात यावे ज्या गटामधून गौण खनिज उत्खनन झाले आहे त्या गटाचा आमच्या समक्ष पंचनामा करण्यात यावा या मागणीसाठी माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप (भाऊ) लगड लगड यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती सेवाभावी संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे यांनी तहसीलदार माळशिरस यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन नायब तहसीलदार कदम साहेब यांनी निवेदन स्वीकारले तसेच यावेळी माहिती सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे, माळशिरस तालुका संघटक वाल्मीक रणदिवे उपस्थित होते सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व खणिकर्म शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना ई-मेलद्वारे दिल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या