शिवजयंती उत्सवाचे चिंचोली मोराची मध्ये आयोजन

शिवजयंती उत्सवाचे चिंचोली मोराची मध्ये आयोजन


चिंचोली मोराची (ता.शिरूर ,जि.पुणे ) : शिवाभिमान कला क्रिडा मंच वतीने मागील तेरा वर्षांपासून शिवजयंती उत्सव शिवचरित्रपर,स्फूर्तीदायक, प्रबोधनात्मक व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन संघटनेमार्फत करण्यात येते.
     या वर्षी ही शिवाभिमान कला क्रिडा मंचच्या वतीने १९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच ते रात्री दहा यावेळेत या
उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.सोबत या उत्सवामध्ये (वर्ष ३ रे) चिंचोली फेस्टीव्हल चे नियोजन केले आहे.या फेस्टीव्हल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम,पोवाडे,भाषण,शिवचरित्रपर गीते,प्रबोधन गीते,स्फूर्ती गीते,शेतकरी गीते असा बहुरंगी संगीताचा मिलाफ असलेला कार्यक्रम सादर होणार आहे.या उत्सव दरम्यान भव्य शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने साजरा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
     या कार्यक्रमांसाठी विविध राजकीय पक्ष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाअभिमान कला क्रीडा मंच,तरूण वर्ग,समस्त चिंचोलीकर परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या