पिंपरी तालुका माळशिरस येथील गौण खनिज उत्खननाचा पंचनामा करुन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा माहिती सेवाभावी संस्थेचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन

पिंपरी तालुका माळशिरस येथील गौण खनिज उत्खननाचा पंचनामा करुन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा माहिती सेवाभावी संस्थेचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन


मौजे पिंपरी या ठिकाणी गट नंबर 467/1 या क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात मनगटशाहीच्या जोरावर दंडलशाही करत अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे सदर उत्खनन हे माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांची परवानगी नसताना करण्यात आले आहे तरी गट नंबर 467/1 या क्षेत्राचा पंचनामा करून तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालय माळशिरस येथे दिनांक 26/02/2024 रोजी तीव्र स्वरूपात हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असे आशयाचे निवेदन माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप (भाऊ) लगड यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती सेवाभावी संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे यांनी तहसीलदार माळशिरस यांना दिले आहे. सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रति माननीय मंडलअधिकारी साहेब नातेपुते, गावकामगार तलाठी पिंपरी यांना दिलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या