क्रांतीकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा विजय ,,मौजे आढेगाव येथील बेमुदत धरणे आंदोलन आज ६ वा दिवस लेखी आश्वासन नंतरच आंदोलन स्थगित..२९/२/२०२४ ला ८-अ उत्तरे हातात.देनार

क्रांतीकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा विजय ,,मौजे आढेगाव येथील बेमुदत धरणे आंदोलन आज ६ वा दिवस लेखी आश्वासन नंतरच आंदोलन स्थगित..२९/२/२०२४ ला ८-अ उत्तरे हातात.देनार
 

क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुका अध्यक्ष आकाश खंडाळे व माढा तालुका युवक अध्यक्ष पप्पू पतंगे शाखाध्यक्ष सुरेश निकम, शाखा कार्याध्यक्ष आनंद साठे, गावातील ग्रामस्थ हे मुदत धरणे आंदोलनास बसले होते.त्यांच्या मागण्या. मागणी क्रमांक १.) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक १८ जुलै २०१६ नुसार सर्व आढेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील , सर्व लोकांच्या घरांच्या नोंदी नमुना नंबर ८-अ घेऊन गरीब वंचित दुर्बल व अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय त्यांना तात्काळ कर आकारणीचे असेसमेंट उतारे अदा करण्यात यावे.मागणी क्रमांक २.) मौजे आढेगाव येथील मातंग समाज मंदिर वरती सुसज्ज अशी एक रूम काढून त्यावरती वाचनालय सुरू करणे बाबत.. मागणी क्रमांक ३.) मौजे आढेगाव मधील गट नं.१३७/१,१३७/२, व १८ मध्ये गावठाण विस्तार योजना अंतर्गत तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावेतमागणी क्रमांक ४.) मौजे आढेगाव ग्रामपंचात ग्रामनिधी मधील १५%निधी मागासवर्गीय यांचा आहे त्यातून डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी सामूहिक कार्यक्रम शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी निधी आरक्षित ठेवण्याबाबत.. मागणी क्रमांक ५.) मौजे आढेगाव मधील गट नं.१३७/१,१३७/२, व १८ मध्ये सध्या राहणाऱ्या नागरिकांना कर आकारणीचे नमुना ८-अ,उतारे तात्काळ देण्यात यावेत तो अधिकार ग्रामपंचायतला आहे.वरील मागण्याच्या अनुषंगाने चालू असलेले २४ तास रात्रंदिवस बेमुदत धरणे आंदोलन चालू होते. सर्व मागण्यांच्या अनुषंगाने यातील प्रमुख मागणी गावातील राहणाऱ्या नागरिकांना आठ असेसमेंट उतारे २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या मासिक सभेमध्ये मान्यता घेऊन देण्यात येतील असे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु सदरच्या उतारे देण्यात आले नाहीत तर १५ एप्रिल २०२४रोजी पासून पुन्हा आंदोलन पुरवता करून बहुसंख्येने क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे लेखी देण्यात आले.
  यावेळी , पंचायत समिती विस्तार अधिकारी शिंदे साहेब, सरपंच कांतीलाल भौय्या केळे, उपसरपंच वाघ , ग्रामसेवक शेख भाऊसाहेब, पोलीस कॉन्स्टेबल हजारे साहेब, व प्रमुख उपस्थिती गणेश भाऊ भोसले साहेब संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य, तसेच राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम साहेब,पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय उर्फ लल्लू गायकवाड, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोल दादा भोसले, माळशिरस तालुका युवक अध्यक्ष विशाल भाऊ तूपसैंदर, सोलापूर जिल्हा सरचिटणीस संग्राम भाऊ लांडगे, उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाळे, माढा तालुका अध्यक्ष अकाश खंडाळे,माढा तालुका अध्यक्ष हनुमंत उर्फ पप्पू पतंगे युवक माढा तालुका अध्यक्ष, माढा तालुका कार्याध्यक्ष अमित बागाव, आढेगाव शाखाध्यक्ष सुरेश निकम, कार्याध्यक्ष आनंद साठे, वडवली शाखाध्यक्ष सुरज बागाव,व टेंभुर्णी चे सामाजिक कार्यकर्ते निलेश खरात व संदीप जगताप उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या