संस्थापक अध्यक्ष संदीप (भाऊ) लगड यांची सचिन रणदिवे यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली
माळशिरस तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून माहिती सेवाभावी संस्था काम करत असून अनेक वर्षांमध्ये माहिती सेवाभावी संस्थेच्या तालुका व जिल्हास्तरावर अनेक जबाबदार पदावर सचिन रणदिवे यांनी काम केले आहे माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली माहिती सेवाभावी संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे यांची पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे गेल्या सात वर्षांपासून एक निष्ठेने माहिती सेवाभावी संस्था या संस्थेमध्ये अनेक पदावर माहिती सेवाभावी संस्थे मध्ये काम करत असताना सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम सचिन रणदिवे यांनी केले आहे यामुळे माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी दिली असून पश्चिम महाराष्ट्र मध्ये माहिती सेवाभावी संस्थेचे काम जोमाने करा अशी शाबासकीची थाप सचिन रणदिवे यांच्या पाठीवर दिली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोमाने काम करेल हे मात्र निश्चित आहे.
0 टिप्पण्या