स्वसंरक्षणासाठी मुलींनी कराटे खेळाकडे वळावे सौ संजीवनी पाटील

स्वसंरक्षणासाठी मुलींनी कराटे खेळाकडे वळावे सौ संजीवनी पाटील

माळशिरस येथे युवायएसएफ कराटे क्लब आयोजित एकदिवसीय  संजीवनी पाटील चषक या कराटे स्पर्धेचे आयोजन मराठी शाळेच्या पटांगणामध्ये करण्यात आले होते या स्पर्धेचे  सामन्याचे उद्घाटन संजीवनी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड मिलिंद कुलकर्णी होते कार्यक्रमाला प्रमुख म्हणून बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा हे होते या स्पर्धेचे आयोजन माळशिरस शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष संतोष वाघमोडे व मित्रपरिवार यांनी केले होते या कार्यक्रमाला नगरसेवक आबा धाईजे आकाश सावंत   दादासाहेब शिंदे प्रवीण केमकर महादेव कोळेकर सुरेश टेळे रघुनाथ चव्हाण चेअरमन शामराव वाघमोडे माजी सरपंच नितीन कुमार थिटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पाटील राजेंद्र वळकुदे  माळशिरस ची पोलीस पाटील शीतल पाटील अभी पाटील राजाभाऊ राजगे रामचंद्र शेंडगे  शोभा वाघमोडे व तानाजी वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते समारंभाला मिलिंद  कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले या स्पर्धेमध्ये सीनियर गटामध्ये संतोष चोरमले पुणे यांनी प्रथम क्रमांक    दिपाली मदने बारामती द्वितीय क्रमांक शेखर मदने लोणंद तृतीय  क्रमांक जूनियर कट प्रीतम कांबळे माळीनगर प्रथम क्रमांक सर्जेराव पोतलकर सदाशिवनगर द्वितीय क्रमांक जाधव सर मोडनिंब तृतीय क्रमांक खुल्ला गट साहिल जानकर पुणे प्रथम क्रमांक श्री चोरमले पुणे द्वितीय क्रमांक ओंकार साठे माळशिरस तृतीय क्रमांक पटकावला या सर्व बक्षीसदात्यांचा सन्मान व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संजीवनी पाटील बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की त्या म्हणाल्या की खेळाबरोबर आत्ता आत्मसंरक्षण व संरक्षण करण्यासाठी कराटे सारखे स्पर्धेची गरज आहे मुलींनी जास्तीत जास्त संख्येने कराटे शिकावे असे आव्हान त्यांनी केले अशा प्रकारची स्पर्धा माळशिरस मध्ये पार पडल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या