मविसे तिसऱ्या आघाडीत सामील होणार ?

मविसे तिसऱ्या आघाडीत सामील होणार ? 

माढा मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावणार - साठे 

नातेपुते येथे मविसे पक्षाच्या शाखेचे उदघाटन


 प्रतिनिधी : नातेपुते : नातेपुते ता ( माळशिरस ) येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन सोहळा पक्षप्रमुख मा श्री किरण साठे यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. 

 
यावेळी राज्यसचिव अनिल साठे,राज्य समन्वयक अजितदादा साठे,तालुका उपाध्यक्ष सतिश साठे,ता विभाग प्रमुख राहुल राणे,विद्यार्थी आघाडीचे साई आडगळे,बापू वाघमारे,दत्ता रुपनवर,बिपीन सातपुते,मार्गदर्शक अक्षय डबडे,शहराध्यक्ष नारायण आवळे,उपाध्यक्ष अजय लांडगे,सचिव अजित भिसे,सरचिटणीस बाळू आवळे,कार्याध्यक्ष बबलू लांडगे,संघटक आकाश मदने,राहुल खिलारे,कृष्णा साठे,हनुमंत साठे,रोहन सोनवणे,सुनिल खिलारे,कुमार खिलारे,कन्हैया खिलारे,वैष्णव खिलारे,नानासाहेब पवार,सचिन खिलारे,सुनिल जगताप,हाबु अवघडे,रायबा भोसले,अजय नाईकनवरे,दयावान कांबळे,रोहन साठे,सुरज मोहिते,सुजित साठे,निलेश साठे,किरण खंडागळे,गिरीराज आडगळे, पत्रकार पवार,भोसले,सचिन रणदिवे यांच्यासह गारवड,दहिगाव,पिरळे,कोथळे कारुंडे,माळशिरस,नातेपुते परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी बोलताना पक्षप्रमुख किरण साठे म्हणाले की राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता विचार धारेला काहीच महत्त्व राहिलेले नसून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे सरकारला काहीच घेणं देणं नाही.माढा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष महत्वाची आणि निर्णायक भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले.माढा लोकसभा मतदारसंघात सत्ता परिवर्तन करण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असून आघाडीत एकूण तेवीस पक्ष संघटना सामील असून त्या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे साठे म्हणाले.त्यामुळे तिसऱ्या आघाडीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष सामील होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या