नातेपुते मध्ये आनंदोत्सव
प्रतापगडावरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी 2004 साली विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात मोठे आंदोलन केले गेले.त्या आंदोलनात आपल्या नातेपुते शहरातून १६ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. व महाराष्ट्रातून शेकडो शिवभक्तांना अटक करण्यात आली होती . ही केस मागे घेण्याकरिता व सर्वांना निर्दोष मुक्त करण्याकरिता विश्व हिंदू परिषदेने सतत पाठपुरावा केला.
विश्व हिंदू परिषदेच्या या पाठपुराव्यामुळे व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून अनेक आंदोलकांवरिल खटले मागे घेण्यात आले व केस बरखास्त करण्यात आली
मा. मुख्यमंत्री व दोन्ही मा, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र शासन व प्रशासन यांचे विश्व हिंदू परिषदे तर्फे हार्दीक आभार मानण्यासाठी आज नातेपुते येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवजयंती महोत्सव समिती संस्थापक सुनील राऊत भाजपा नेते गणेश पागे , मंगेश दिक्षीत , शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ , बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अविनाश देवकर, धनंजय पवार विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अनिकेत कुलकर्णी तालुका आखाडा सहसंयोजक गिरीश पदमन शहर संयोजक पृथ्वीराज पवार जयंत बुवा राजू सोरटे राहुल पदमन सुधीर काळे नंदू जडकर संदिप गटकूळ संतोष पागे संतोष पदमन व सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या