माळशिरस तालुक्यात मलिदा गॅंग सक्रिय?
काय ती दारू काय ते मटण काय ती मेजवानी काय तो पुढाऱ्यांचा ताल सगळं कसं ओके मध्ये आहे?
प्रतिनिधी सचिन रणदिवे
माळशिरस तालुक्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यामध्ये समोरासमोर लढत होणार असून माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनलक्ष्मी उधळण्याचे काम सुरू झाले आहे या निवडणुकीमध्ये मलिदा गॅंग सक्रीय झाली असून माळशिरस तालुक्यामध्ये संध्याकाळच्या दरम्यान हॉटेल वरती काय ती दारू काय ते मटण काय ते हॉटेल वरची मेजवानी काय तो पुढाऱ्यांचा ताल सगळे एकदम ओके मध्ये आहे असे चित्र पाहावयास मिळत आहे? या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या गटाकडून मलिदा पुरवला जात आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे माळशिरस तालुक्यामध्ये मलिदा गॅंग सक्रिय झाल्याची चर्चा संबंध माळशिरस तालुक्यामध्ये जोर धरू लागली आहे. नेमकं कोणाची गॅंग सक्रिय आहे हे लवकरच समोर येईल?
0 टिप्पण्या