कऱ्हा नदीपात्रातील बंधाऱ्याचे बर्गे चोरणारी टोळी जेरबंद..!




वडगाव निंबाळकर व बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये १४ ऑगस्ट २०२१ ते २ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये लोणीभापकर आणि जळगाव सुपे गावच्या हद्दीत करा नदीचे पात्रातील बंधाऱ्यावरील बर्गे चोरी करण्यात आले होते. म्हणून शिवराज माणिक सांगोडे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी 
१) रुपेश मोहन इनामके (वय-२१)
 शेरेचीवाडी ता. बारामती जि. पुणे) 
याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार :-
२) पांडुरंग बंडाची लडकत (वय-30)
शेरेचीवाडी
३) विवेक प्रकाश जराड (वय-२३)
उंडवडी कडेपठार , बारामती.
४) अभिजीत धोंडीबा तांबे (वय-२३)
पानसरेवाडी,सुपे.
५) रियाज दिलावर सय्यद (वय-२८)
रीसे-पिसे , पुरंदर.
६) मोहन रघुनाथ इनामके (वय-२५)
शेरेचीवाडी ,बारामती.
या सर्वांनी पानसरेवाडी येथील बालकांच्या मदतीने नदीच्या पात्रातील व जळगाव सुपे येथील बंधाऱ्याचे बर्गे चोरी केल्याची कबुली दिली असता वरील सहा जणांना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली.
    ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, श्री गणेश कवितके ,योगेश शेलार, त्यांच्यासह पोलीस अंमलदार बापू पानसरे ,हिरालाल खोमणे,पोपट नाळे,अमोल भुजबळ,
सचिन दरेकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या