माळेगाव परिसरात अवैध धंदे जोमाने सुरू...! दारूच्या अवैध धंद्यांना कोणाचा आश्रय...?


माळेगाव परिसरात अवैध धंदे जोमाने सुरू...! दारूच्या अवैध धंद्यांना कोणाचा आश्रय...?


दि२० जुन २०२४

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारूबंदी वरून दारूबंदी करण्यासाठी  माझी जरी भट्टी असली, तर मलासुद्धा टायरमध्ये घाला, अशा शब्दात अजित पवारांनी पोलीस यंत्रणेला सुनावले होते.या नंतर आठ ते दहा दिवस फक्त धंदे बंद करण्याच्या नावाखाली कारवाई करण्यात आल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये अवैध धंद्यावर उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणा यांचे नियंत्रण नसल्याने माळेगाव पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोमाने सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलले असता आम्ही कारवाई करू अशी आश्वासन दिले जातात . परंतु धंदे हे रात्रीच्या वेळी जोमाने सुरू आहेत. अशा आश्वासनावरती धंदे बंद का होत नाहीत ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत. 

माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भांगे साहेब यांनी बराच प्रयत्न केला असता या धंद्यांवरती अंकुश ठेवणे शक्य झाले होते परंतु त्यांच्या बदलीच्अया वार्तेने अवैध धंदे जोमाने सुरू झाल्याची वार्ता मिळत आहे. गुन्हे दाखल होतात परंतु वातावरण शांत झाले की लगेचच पुन्हा अवैध धंदे दारू विक्री करीत असतात. त्यांना या धंद्यांमध्ये आश्रय मिळत असल्याने त्यांची जोमाने अवैध धंदे करण्याची हिम्मत होते. त्यामुळे अशा कारवाई या फक्त दिखावा म्हणुन केल्या जात आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे या सर्व गोष्टीमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डगमकताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या