माळशिरस आगमी विधानसभा निवडणुक मतदान प्रक्रियेमध्ये एकही पात्र मतदार, मतदानापासून बंचित राहू नये, यासाठी प्रयत्न असून, माळशिरस विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण अंतर्गत माळशिरस शहरामध्ये मतदारांची संख्या लक्षात घेता, दोन नविन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून तसेच १० मतदान केंद्रांची विलीनीकरण करण्यात आल्याची माहिती, मंडळ अधिकारी माळशिरस तथा पर्यवेक्षण अधिकारी, शरद खंडागळे यांनी दिली.
माळशिरस शहरामध्ये मतदान केंद्र क्र. १३७ पत्ता, जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा मुले नं १ नविन स्लंब इमारत पूर्वेकडून उत्तराभिमुख खोली नं.३ व मतदान केंद्र क्र १४२ पत्ता, गोपाळराव देव प्रशाला, जुनी पत्र्याची इमारत पूर्वाभिमुख उत्तर बाजूची खोली नं १ माळशिरस या दोन नविन मतदान केंद्राची निर्मिती केली आहे. तसेच मतदान केंद्र क्र.१३५,१३६,१३७,१३८.१३९,१४०,१४१.१४२.१४४.१४५ हया मतदान केंद्रांचे विलीनीकरण करणेत आले आहे. तरी वरील केंद्रात मतदान असणा-या सर्व मतदारांनी आपली नावे, कोणत्या मतदान केंद्र भागामध्ये आहेत, याची खातरजमा सबंधीत बी.एल. ओ. यांचेकडे जाऊन करणेत यावे.
लोकसभा निवडणूकीत ज्या मतदारांची नावे, मयत, स्थलांतरीत किवा गैरहजर या प्रकारात वगळणेत आली होती, त्यांची नावे संबंधीत बी.एल. ओ. हे घरोघरी जावून फेरतपासणी करुन, मतदारांची आवश्यक तो खातरजमा करुनच नजर चुकीने वगळणेत आलेल्या मतदारांचा फॉर्म नं. ६ भरुन पुनश्च यादीत नावे समाविष्ट करणेत येतील. तसेच नविन मतदारांची नोंदणी करणेत येईल, ज्या मतदाराचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, तर त्यांनी आपले भागातील बी.एल.ओ. यांचेशी संपर्क साधून, फॉर्म नं.६ भरुन देणेत यावा मतदार यादीत एकाच कुटुंबातील सदस्य विभक्त झालेस ते इतर केंद्रात असतील, तर अशा कुटूंबातीत व्यक्तीना एकाच केंद्रात ठेवणेसाठी फॉर्म नं.८ बी.एल. ओ यांचेकडे भरुन देणेत यावा, असे मतदारांना आव्हानीत करणेत आले आहे
0 टिप्पण्या