दोस्ती कर्णासारखी असावी परंतु दोस्त दुर्योधनासारखा नसावा असं तुम्ही उत्तमराव जानकर यांच्या बाबतीत वागल्याचे माळशिरस तालुक्यामध्ये दिसून येत आहे
गेल्या पंचवीस वर्षात उत्तमराव जानकर यांनी तुमच्यासोबत कर्णासारखी मैत्री केली परंतु तुम्हीमात्र त्यांच्यासोबत दुर्योधनासारखे वागला
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यात जिवलग दोस्ताला म्हणजेच उत्तमराव जानकर यांना विरोध करून बीडचे रहिवासी असणारे राम सातपुते हे माळशिरस तालुक्यात आणून आमदार केले असाच तुम्हीच ढोल बडवताना माळशिरस तालुक्यामध्ये दिसून येत आहे आताही येणाऱ्या आगामी 2024 च्या निवडणुकीमध्ये कांबळे म्हणून कोणीतरी माजी खासदाराचा मुलगा माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा आयात करताना दिसत आहे यामध्ये नेमका तुमचा हेतू काय माळशिरस तालुक्यात मध्ये वेळापूर मधून माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव सावंत व माळशिरस शहर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा सावंत यांचा चिरंजीव नगरसेवक आकाश सावंत,माळशिरसचे माजी सरपंच विकास धाईंजे,तसेच मी स्वतः माजी जिल्हा परिषद सदस्य किंवा तुमच्या गावचे रहिवासी असणारे प्राध्यापक मार्तंड साठे सर,चांगदेव कांबळे, भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ राहिलेले आनंत खंडागळे एवढी लोक माळशिरस तालुक्यामध्ये ए सी प्रवर्गाचे असताना तुम्ही माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एसी प्रवर्गासाठी राखीव असताना देखील गेल्या पंचवार्षिकला व याही पंचवार्षिक ला तुम्ही आयात उमेदवार आणण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे माळशिरस तालुक्यातील एसी प्रवर्गातील तसेच बहुजन समाजातील जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही महायुती घटक म्हणून आरपीआय पक्ष, लहुजी शक्ती सेना देखील आपल्या सोबत युतीमध्ये असताना आपणास माळशिरस तालुक्यातील स्थानिक दलित नेत्यांची आठवण का होत नाही के के पाटील साहेब तुम्ही मला याचं उत्तर द्या ज्या वेळेस तुमच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यावेळेस व तुम्ही पंचायत समिती सदस्य झाला त्या कार्यकाळामध्ये तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील दलित समाजातील लोकांनी मत दिली होती.तुम्हाला बाहेरच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील दलित समाजातील लोक मतदान करण्यासाठी आलेली नव्हती याचाही विचार तुम्ही करावा असे बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या