मौजे अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील बी. फार्मसी च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनी पुजा शिरसकरने ग्रेजुएट फार्मेसी एप्टीट्यूड टेस्ट या भारत सरकारच्या राष्ट्रिय स्पर्धा परीक्षेत 215 मार्क मिळवून उत्तिर्ण झाले असून निकिता भोसले (202), सलोनी तळेकर (199), स्नेहल मोरे (173), भाग्यश्री घाडगे (162), तुषार दडस (162), स्वरांजली पाटील (151), अशोक बेंदगुडे (146) व ऐश्वर्या देशमुख (113) मिळवून परीक्षेत यश मिळवल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा एम. फार्मसी या पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून स्कॉलरशिप देखील दिली जाते.
अशा या परीक्षेत मिळालेल्या
यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी विद्यार्थिनीला डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. कोमल साळुंखे,डॉ. सचिन सकट यांचे मार्गदर्शन लाभले.
0 टिप्पण्या