प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे विश्वासू सहकारी सुरेश आबा पालवे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची निरीक्षक पदाची जबाबदारी मिळाली आहे. सदर निवडीच्या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे आपण बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रमुख मान्यवर आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन संपर्क करावा तसेच आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्व नियोजन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत आपल्या निवडीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या सहीने सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे-पाटील यांना दिले आहे सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव मा ना श्री अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिली आहे.
0 टिप्पण्या