बी. फार्मसी २०२४ करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

बी. फार्मसी २०२४ करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

गणपती फार्मसीमध्ये मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी महाराष्ट्र शासनच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रम च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी http://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावरून कळवले आहे . 
गणपती फार्मसी अकोले खुर्द तालुका माढा येथे मोफत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा. डॉ. आर. डी .बेंदगुडे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी
करण्याकरता बुधवार दि. ०७ ऑगस्ट २०२४ बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत कालावधी दिला आहे. सदरील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी http://cetcell.mahacet.org या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या सर्व संबंधित विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्याकडून या प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरताना बऱ्याच चुका होत असतात आणि धावपळ ही होत असते त्यादृष्टीने गणपती फार्मसीने बी फार्मसी २०२४ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाची संबंधित कागदपत्रे ओळखपत्र / आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम किंवा ऑनलाईन पेमेंट सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ७७४५०८२७५४, ९५४५५५३६९० या क्रमांकावर संपर्क करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या