नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षासाठीसाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माण-खटाव (सातारा), मोहोळ (सोलापूर) विधानसभा मतदार संघाकरिता विशेष निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मा.आ.श्री. बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा प्रभारी व मा. खा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील, श्री. शेखर माने, सोलापूर जिल्हा निरीक्षक यांचेशी समन्वय साधून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करावी. तसेच विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त करून देऊन सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा अपेक्षा व्यक्त करतो अशा आशयाचे निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहे.
0 टिप्पण्या