"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करून सांगणारे आणि स्वराज्य प्राप्तीसाठी जनजागृती करण्याकरिता मराठा व केसरी ही वृत्तपत्र सुरू करून त्यांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे, लोकमान्य पदवी प्राप्त केलेले बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी या निमित् तसेच फक्त दीड दिवसाच्या शिक्षणाचा अनुभव घेवून ज्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्यांचे वाडःमय रशियन भाषेमध्ये प्रसिद्ध असलेले, ज्यांचा पुतळा रशियामध्ये उभा असलेले , ज्यांच्या कथांवर अनेक चित्रपट काढण्यात आलेले असे थोर समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठें यांच्या जयंतीनिमित्त रत्नत्रय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी वरील उद्गार काढले.
गुरुवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 , आज रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यार्थी आरोही हेळकर, तनिष्का बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व बालाजी दामोदरे याने वेशभूषा करून थोरांना आदरांजली वाहिली. यावेळी जवंजाळ मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्व विद्यार्थ्यांनी थोरांचे विचार आत्मसात करावे तरच खऱ्या अर्थाने जयंती व पुण्यतिथी साजरी होईल असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यमाची विद्यार्थ्यांनी वैष्णवी मोहिते हिने केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अनंतलाल दादा दोशी, मुख्याध्यापक श्री वाघमोडे सर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या