मांडवे ग्रामपंचायत हद्दीतील 51 फाटा देवगुंडे वस्ती रस्त्याचे बोगस बिल काढण्याचा प्रयत्न?

मांडवे ग्रामपंचायत हद्दीतील 51 फाटा देवगुंडे वस्ती रस्त्याचे बोगस बिल काढण्याचा प्रयत्न?
मौजे मांडवे ग्रामपंचायत ता माळशिरस जिल्हा सोलापूर १५ वा वित्त आयोग टेंडर क्र ०५/२०२३-२४, ५१ फाटा देवगुंडे सिद टेळेवस्ती रस्ता या ठिकाणी मुरूम व खडी याची एकही पाटीही न टाकता माळशिरस पंचायत समिती मधील शाखा अभियंता मुलाणी व उप अभियंता *रणवरे* यांना हाताशी धरून मांडवे ग्रामपंचायत सदस्य यांनी एमबी बनवली आहे व बोगस बिल काढण्यासाठी तयारी केली आहे यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कागदपत्रे संबंधित सदस्यांना देऊन गैरप्रकार केला आहे तरी दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी,
मागेही असेच शाखा अभियंता व इतर अधिकारी यांनी भोंडवेवस्ती दलित वस्ती या कामाच बोगस बिल काढून कागदोपत्री योग्य दाखवले आहे,
तरी या संबंधित विषयांमध्ये आपण लक्ष घालून उपाभियंता व शाखा अभियंता यांच्यावर खातेनिहाय चौकशी लावून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्यास प्रस्ताव बनवावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त पुणे यांना ग्रामपंचायत सदस्य रितेश बबनराव पालवे पाटील यांनी दिले आहे सदर निवेदनाची माहितीसाठी प्रत कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम विभाग सोलापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस,उपअभियंता,जिप विभाग, पंचायत समिती माळशिरस यांना दिले आहे.

चौकट

मांडवे गावात सध्या अशी चर्चा आहे की आमच्या भगीनी सौ शितल अर्जुन दुधाळ सरपंच मांडवे यांना या बोगस बिलाच्या प्रकरणात अडकवण्याचा व राजीनामा घेण्याचा काही ग्रामपंचायत सदस्यांचा डाव होता, 
पण सरपंच सही होण्याआधीच हे प्रकरण मी उजेडात आणले
याप्रकरणात शाखा अभियंता मुलाणी आणि उप अभियंता रणवरे साहेब यांनी रस्ता बनलेला नसताना सिद देवगुंडे वस्ती रोड च्या कामाच्या एम बी वर सही केली.

ग्रामपंचायत सदस्य रितेश बबनराव पालवे-पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या