माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी यांचा भारतीय दलित महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ मदने यांच्यावतीने सन्मान

माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी यांचा भारतीय दलित महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ मदने यांच्यावतीने सन्मान



माळशिरस पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी साहेब यांचा सन्मान भारतीय दलित महासंघ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ मदने वतीने हार फेटा,गुलाब पुष्प व झाड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन होळकर, यशवंतराव मोहिते, लखन मदने,भीम मदने यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपण समाजातील काहीतरी देणे लागतो माळशिरस पोलीस स्टेशन हे तालुक्याचे ठिकाण असून माळशिरस तालुक्यातून शासकीय कामानिमित्त अनेक नागरिक येत असतात त्या सर्वसामान्य गोरगरिबीचे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पोलीस बांधवांचे सहकार्य लाभावे म्हणून नव्याने रुजू झालेले माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी यांचा सन्मान करून त्यांना भारतीय दलित महासंघाच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या