विद्यार्थ्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात लागणारे स्किल्स आत्मसात करावेत: जुबेर शेख

विद्यार्थ्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात लागणारे स्किल्स आत्मसात करावेत: जुबेर शेख
_श्री गणपती फार्मसी टेंभुर्णी मध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न_

श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी महाविद्यालयामध्ये सातारा येथिल जेबीजे एज्युकेशनचे संस्थापक श्री. जुबेर शेख यांचे "फ्रॉम कॅम्पस टू कार्पोरेट - इसेन्सीयल स्किल्स फॉर फार्मा अंडरग्रॅज्यूएटस्" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रातील सध्याच्या गरजांनुसार त्यांना आवश्यक स्किल्स बाबत अवगत करणे महत्वाचे असून त्यामुळे विद्यार्थ्यांकडे तसा स्किलसेट तयार होईल जो पुढे त्यांना फायदेशीर ठरेल. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जुबेर शेख यांनी प्रथम सत्रामध्ये तृतीय आणि चतुर्थ वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, मुलाखत तयारी, रेझूमे तयार करण्याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. ग्रुप डिस्कशन बद्दलही मुलांची तयारी करून घेतली. दुसऱ्या सत्रात द्वितीय वर्ष बी फार्मसी व द्वितीय वर्ष डी. फार्मसी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व ध्येय-निश्चिती व यशस्वी करिअर साठी सतत प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे खूप गरजेचे असल्याचेही सांगितले. औषधनिर्माण शास्त्रातील संधी खूप प्रमाणात वाढत असून यासाठी कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांची गरज खूप वाढत चालली आहे. कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे (पदवी) व प्रा. धनश्री कारंडे (डिप्लोमा), सह-समन्वयक प्रा. कोमल साळुंखे यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. प्रशांत मिसाळ, डॉ. सचिन सकट, प्रा. शिवराज ढगे, प्रा. अक्षय भेंकी सर्व शिक्षक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे तसेच संस्थापक सचिव प्रा. डॉ. रवींद्र बेंदगुडे, उपाध्यक्ष श्री. बाबा येडगे, अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे यांचे अश्या कार्यक्रमासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असून त्यामुळे महाविद्यालयाचा प्रगती आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या