माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश
प्रतिनिधी-सचिन रणदिवे 

पिसेवाडी (ता.माळशिरस):०६ सप्टेंबर २०२४, ग्रामपंचायत कार्यालय पिसेवाडी या ठिकाणी,माढा लोकसभेचे खासदार श्री. धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माळशिरस तालुक्यातील जनतेचे आमदार,लोकनेते श्री.उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते श्री.साहिलभाई आतार (ग्रामपंचायत सदस्य, पिसेवाडी) व त्यांच्या सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी नवनियुक्त माढा लोकसभेचे खासदार श्री. धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजनही करण्यात आले. होते. याप्रसंगी पिसेवाडी ग्रामस्थांच्या वतीने माननीय श्री. उत्तमराव जानकर साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यथोचित मार्गदर्शन केले.
       यावेळी श्री.रवीभाऊ पाटील(कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सोलापूर),श्री.अरुण तोडकर(जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल ),श्री.भानुदास आप्पा सालगुडे,श्री.अजय सकट(मा. पंचायत समिती सदस्य माळशिरस), युवानेते पैलवान श्री.दत्ताभैय्या मगर,युवानेते श्री. सोमनाथ पिसे (माळशिरस तालुका अध्यक्ष ओबीसी सेल), माळशिरस तालुक्यातील सामाजिक,आर्थिक, राजकीय,शैक्षणिक,क्रीडा, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर-पदाधिकारी, पिसेवाडी गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या