मुस्लिम समन्वय समितीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी समीर मुलांनी यांची निवड

मुस्लिम समन्वय समितीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी समीर मुलांनी यांची निवड 


प्रतिनिधी/सचिन रणदिवे 


मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस गावचे समीर इनुस मुलाने यांची मुस्लिम समाजाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सर्व समाजातील युवाशक्ती संघटन करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून सर्व समाजाला सहकार्य करत आहात समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न पाहता आपली नियुक्ती मुस्लिम समाज समिती महाराष्ट्र राज्याच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी करण्यात येत आहे आपण मुस्लिम समाज समितीच्या माध्यमातून सर्वसामाजिक शक्ती संघटित करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडून सर्व समाज सहकार्य व सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील राहाल ही अपेक्षा असे आशयाचे निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष रशिद भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष सलीम भाई मुलांणी यांच्या सहीने देण्यात आले याप्रसंगी मुस्लिम समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या