संगम मध्ये सद्गुरु कृषी महाविद्यालयांच्या कृषीदुतांनी दिले शेतकऱ्यांना धडे..
माळशिरस तालुक्यातील संगम येथे सदगुरु कृषी महाविद्यालय,मिरजगाव येथील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी या परिसरात शेती अभ्यासासाठी दाखल झाले आहेत. संगममधील ग्रामस्थ शेतकरी बंधू भगिनी यांनी कृषिदुतांचे स्वागत केलय त्यानंतर गावातील ग्रामपंचायत, सावडी, अंगणवाडी, प्राथमिक शाळा यांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. संगम तालुका माळशिरस परिसरातील कृषी अभ्यासाकरिता आलेल्या कृषीदुतापैकी अच्युत सोनवणे, पंकज सताळे,अभिषेक कणसे,अभिषेक तोरडमल,गौरव माने,सुशांत सदाफुले सहभागी आहेत. येथे दहा आठवडे वास्तव्य करणार आहेत यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शेतीपद्धती पीक प्रात्यक्षिकाची माहिती शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करणारे सोसायटीचे कार्य कशापद्धतीने चालते हे समजून सांगण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक आणि शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिला.
0 टिप्पण्या