यवत येथील एटीएम चोरीचा पर्दाफाश...!!


 दिनांक १७ जानेवारी रोजी यवत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून २३ लाख ८० हजार ७०० रुपयांची रक्कम चोरट्याने लंपास केली होती सदर गुन्ह्याचे तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनात चार पथकांची नेमणूक करण्यात आली होती.
गोपनीय माहितीवरुन अजय रमेशराव शेंडे (वय ३२ रा. सहजपुर) यास ताब्यात घेऊन तपास केला असता सदरचा गुन्हा साथीदार शिवाजी उत्तम गरड (वय २५ रा. करंणी लेहणी ,ता.रिसोड, जि. वाशिम) ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय २२ रा.देवधानुरा ता. कळंब जि.उस्मानाबाद) व इतर दोन साथीदार यांच्या मदतीने केल्याचे उघड झाले असून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेपैकी १० लाख व चोरीस वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असुन चौकशी दरम्यान कुरकुंम येथील ए.टी.एम व वाशिम येथे घरफोडीतुन १२ तोळे सोने व लॉपटॉप असा १ लाख ८४ हजाराचा चोरीचा गुन्हा , गातेगाव येथील ए.टी.एम फोडुन ७ लाख ६७ हजाराचा गुन्हा तसेच गुन्हात वापरलेली मोटार सायकल चोरीचा लोणी काळभोर येथील गुन्हे उघड झाले असुन याबाबतीत अधिक तपास पोलिस निरिक्षक अशोक शेळके व पोलिस निरिक्षक नारायण पवार यांंच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक संजय नागरगोजे करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या