मुलीला ठार मारण्याची भीती दाखवून महिलेवर अत्याचार....!!



पुण्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून पोलीस आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली हे सर्व घटना २०१८ ते १ जानेवारी २०२२ यादरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पीडित महिला तिच्या मुलीसह राहत असताना.अटक करण्यात आलेला आरोपी वसंत बबन भोगसे ( वय 42 रा.तळेगाव दाभाडे ता. मावळ) याची महिले सोबत ओळख झाली. या ओळखीतून आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने त्याला विरोध केला असता. मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला.

याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद शिपणे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या