मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने रविवारी, ३१ मे २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन आदेश जारी करत राज्य उत्पादन शुल्क विभागातील (State Excise Department) वरिष्ठ अधिकारी यांना पदोन्नती दिली आहे. या आदेशानुसार, विभागातील सह आयुक्त (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर आयुक्त (गट-अ) या उच्च पदधारेवर पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये श्री. विश्वनाथ इंदिसे यांचा समावेश आहे. यांची अपर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई या मंजूर रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
गृह विभागाचे उप सचिव श्री. रविंद्र औटे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात, त्यांना नेमून दिलेल्या मुंबईतील कार्यालयात तात्काळ हजर होऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या अपर आयुक्तांच्या अंतर्गत कार्यवाटपाबाबत (Work Distribution) कार्यालयीन आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचे अधिकार राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना देण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या