बारामतीत महिलेवर ऑफिसमध्ये घुसून केले वार, घटना CCTV मध्ये कैद..!



पुणे : बारामती मध्ये घटना घडलेली असून याठिकाणी पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या एका महिलेवर ऑफिसमध्ये घुसून चाकूने हल्ला करण्यात आला.आरोपीने संबंधित महिलेच्या हातावर वार करून हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली.  ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली आहे. 
या घटनेची माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले . घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या