कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार असून त्यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. त्यानुसार २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
२३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधिक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचा झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत.
शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केलेलं. त्यानंतर या प्रकरणात ॲड प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.
0 टिप्पण्या