प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवारावर जर गावगुंडांनी हात उचलला तर त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना गावगुंडांना विटाचे उत्तर दगडानेच देणार असल्याचे त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड हे पत्रकारांशी बोलत होते.आज महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवार सुरक्षित नाही.महाराष्ट्र राज्यातील पुर्ण सैनिक संघटना फक्त नि फक्त सैनिक व सैनिक परिवारासाठीच काम करणा-या असाव्यात ज्या सैनिक संघटना सैनिक व सैनिक परिवारवर गावातील या तालुक्यातील गावगुंड हाणमार करत असतील त्या सैनिक संघटना तमाशा व मजाक बघत असतील अशा संघटना बरखास्त व अशा संघटनेच्या पदाधिकारी यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे.व युवा वर्गाला त्या संघटनेचा कारभार दिला पाहिजे काही संघटना अशा आहेत कामही नाही करायचे व पदही नाही सोडायचे अशा संघटनांना त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.आणी त्या गावात व तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना करण्यात येणार आहे.त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना फक्त नि फक्त जवानांची व सैनिक व सैनिक परिवाराची संघटना आहे.या संघटनेमध्ये सैनिक व सैनिक परिवार अन्याय व अत्याचार झाल्यास सहन करून घेतला जाणार नाही.ज्या संघटना फक्त नि फक्त पदासाठी व नावासाठी असतील अशा संघटनेमध्ये सभासदत्व घेवून नका असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांनी केले आहे.सैनिक व सैनिक परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी गाव तेथे त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखेची स्थापना केल्याशिवाय अन्याय व अत्याचार थांबणार नाही.
महाराष्ट्र राज्यातील काही अशा संघटना आहेत त्यांना सैनिक व सैनिक परिवाराचे काहीच घेणे देणे नाही.सैनिक व सैनिक परिवारावर अन्याय व अत्याचार झाला तरी ते गप्प राहतात अशा पदाधिकारी यांचे काय करायचे?काही सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांनी आपली संघटना फक्त नि फक्त राजकीय पक्षामध्ये सामील केली आहे.त्या संघटनेचे सभासद ही त्यांच्या विरोधात आहेत.अशा संघटना का बरखास्त करू नये.त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रवक्ता एस.के.आठरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.सैनिक व सैनिक परिवाराने दीन टक्के राजकीय माजी सैनिकांच्या नादी लागू नका व तो दोन टक्के माजी सैनिक सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करत आहे यांच्यापासून सावध रहा.महाराष्ट्र राज्यात जो पर्यंत गावोगावी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखेची स्थापना झाल्यानंतर .गावगुंडांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी सैनिक व सैनिक परिवाराने एक कदम पुढे येण्याची गरज.
0 टिप्पण्या