रुपाली चाकणकरांची आक्रमक भूमिका. गुन्हे दाखल करण्याचा इशारा..!



महिलांविषयी एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पुन्हा जर काही वादग्रस्त वक्तव्य केलं तर राजकीय पुढारी असो किंवा इतर कुणीही व्यक्ती असो त्यांच्यावर थेट महिला आयोग गुन्हा दाखल करेल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. जळगावात तक्रारींच्या जनसुनावणीसाठी चाकणवर उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला आहे.
'राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं समोर आलं होते. राज्य महिला आयोगाकडून त्यांना नोटीसही पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांचा माफीनामाही प्राप्त झाला. महिलांविषयी अनेक कायदे आहेत, मात्र त्यानंतरही अशा पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या संस्कार व संस्कृतीचा भाग आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला तडा जाणार नाही असे वर्तन करू नये,' असं आवाहनही चाकणकर यांनी केलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या