भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद .! अरुणाचलमध्ये हिमस्खलन


अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या तडाख्यात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलनात ७ जवान अडकल्याची बातमी ६ फेब्रुवारीला देण्यात आली होती. त्यांच्या बचावकार्यासाठी लष्कराने मोहीम राबवली. अनेक तास बचावकार्य राबवण्यात आले. पण जवानांना वाचवण्यात यश आले नाही, असे लष्कराने म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमधील उंच शिखरांवर गेल्या अनेक दिवसांपासून खराब हवामान आणि जोरदार हिमवृष्टी होत आहे. अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उंच भागात ६ तारखेला हिमस्खलनाची घटना घडली. यात घटनेत लष्कराच्या ७ जवानांना आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.


अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये ७ जवानांचे एक पथक गस्तीवर होते. यावेळी अचानक हिमस्खलन झाले आणि गस्ती पथकातील सर्व ७ जवान त्या हिमस्खलनाच्या कचाट्यात आले. सर्व जवान बेपत्ता असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. यानंतर सर्व जवानांच्या शोध आणि बचावासाठी एक विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या