कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अभिनेता जितेंद्र पोळला केली अटक..!




कोल्हापूर
छोट्या पडद्यावरील एका कलाकारास राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा, कोल्हापुर) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे. 'गजानन महाराज शेगाव' या मालिकेत पोळ याने भूमिका केली आहे, अशी माहिती त्यांने पोलिसांना दिली आहे.

जितेंद्र पोळ याची शादी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यानं संबंधित महिलेशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण त्या महिलेने लग्नाला नकार दिला. मात्र, त्यानंतरही ती काम करत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन, चोरून पाठलाग करून तिला अडवून लगट करण्याचा प्रयत्न जितेंद्रने केला. तसेच लज्जा उत्पन्न असे कृत्य करून विनयभंग केला. त्यामुळे पोळ याला अटक करण्यात आली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कलगुटकर अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या